मुदत संपलेल्या गाळ््यांच्या बिलप्रकरणी साडेचारशे लेखी हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:26 PM2018-02-22T12:26:40+5:302018-02-22T12:30:31+5:30
मनपा : आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २२ - महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांना दिलेल्या बिलापैकी काही रक्कम हरकती घेत भरलेल्या सुमारे साडेचारशे लेखी स्वरुपातील हरकती मनपा प्रशासनास प्राप्त झाल्या आहे. या आवस्ताव लावण्यात आलेल्या बिलाची रक्कम कमी करून मागितली असून याबाबत आता मनपा प्रशासन काय भूमीका घेते याकडे लक्ष लागून आहे.
महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील २ हजार ३८७ गाळ््यांची मुदत २०१२मध्ये संपलेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने बिले वितरित केली आहे. काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रक्कमेचाच भरणा केला आहे. साडेचारशे गाळेधारकांनी पाच वर्षाचे गाळेभाडे व मालमत्ता कर लावलेल्या बिलात रक्कम, तसेच २०१४-१५ या वर्षाचा लावलेला पाच पट दंड याबाबत हरकती गाळेधारकांनी नोंदविलेल्या आहे.
अवाजवी रक्कम कमी करा
थकीत गाळेभाडे व मालमत्ता करात महापालिकेने अवाजवी रक्कम वाढविल्याने पैसे भरणे अवाक्याबाहेर असल्याचे गाळेधारकाचे म्हणणे आहे. ही रक्कम कमी करून द्यावी इत्यादी मागण्या या हरकती मधून गाळेधारकांनी मांडल्या आहेत.
गाळेधारकांनी नोंदविलेल्या हरकतीची संख्या मोठी असल्याने मनपा प्रशासन हरकती समान असल्यास त्यावर सुनावणी घेवून अथवा आयुक्तापुढे ठेवून यावर काय निर्णय घेतला जावू शकतो. त्यामुळे मनपा प्रशासन बिलांवरील हरकतीवर काय भूमिका घेते याकडे गाळेधारकांचे लक्ष लागले आहे.
गाळेधारकांच्या याचिकेवर ८ मार्चला निर्णय
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांतील गाळे ताब्यात घेण्यासाठी ८१(ब)चे आदेश महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात ८०० व्यापाºयांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश सविता बारणे यांच्यासमोर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद १३ फेब्रुवारीला होवून २१ रोजी निर्णय दिला जाणार होता. परंतू न्यायालयात या प्रकरणात आज कामकाज न झाल्याने न्यायालयाने पुढील तारीख ८ मार्च दिली आहे.