पहूरजवळ कारला अपघात : चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:40+5:302021-06-10T04:12:40+5:30
पहूर ता जामनेर : पारध, ता. भोकरदन येथे जाणाऱ्या कारला पहूर गावाजवळ औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली. यात ...
पहूर ता जामनेर : पारध, ता. भोकरदन येथे जाणाऱ्या कारला पहूर गावाजवळ औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली. यात दोन चिमुकल्यांसह पती-पत्नी जखमी झाले. तर पती गाडीत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तासानंतर यश आले. जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले.
लिहा पारध, ता. भोकरदन (जालना) येथील रहिवासी सचिन रतन काकरवाल हे आपल्या परिवारासह कारने (एमएच १५ जीएक्स ५४२६) पळसखेडा मिराचे (ता. जामनेर) येथून गावाकडे जात होते. पहूरपासून काही अंतरावर औरंगाबाद महामार्गावर आदर्श रोड लाईनजवळ कारचे समोरील टायर फुटले. यात कार दुभाजकावर धडकल्याने कारच्या इंजिनचे तुकडे झाले. यात शीतल सचिन काकरवाल (३२), आयुष सचिन काकरवाल (४) व वीर सचिन काकरवाल (७) हे जखमी झाले. यांना पहूर रुग्णालयात दाखल केले तर सचिन काकरवाल पत्र्यात अडकल्याने त्यांना काढण्यासाठी दीड ता. लागला. ग्राईंडर व लोंखडी सळईच्या सहाय्याने पत्रा कापून बाहेर काढले व पहूर रुग्णालयात दाखल केले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पाटील,अधिपरिचारक दीपक वाघ व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावला हलविले आहे.
मदतकार्य
घटनास्थळी गयासुद्दीन तडवी, फिरोज तडवी, रवींद्र सपकाळ, पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, राजू तडवी, सतीश बारी, तोईक शेख, शिवराज देशमुख, पिंटू सोनवणे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर पांढरे, इरफान शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर युवकांनी मदतकार्य केले. तसेच पोलीस कर्मचारी ईश्वर देशमुख, प्रदीप चौधरी, ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एअर बॅगमुळे बचावले
अपघात होताच कारमधील एअरबॅग ओपन झाल्या. यामुळे कारमधील सर्वांना सुरक्षा कवच निर्माण झाल्याने मोठी जीवितहानी टळली.
===Photopath===
090621\09jal_7_09062021_12.jpg~090621\09jal_8_09062021_12.jpg
===Caption===
पहूर औरंगाबाद महामार्गावर कारला झालेल्या अपघातात कारचा पत्रा कापून जखमी सचिन यांना बाहेर काढताना युवक तर दुसऱ्या छायाचित्रात जखमी विर काकरवाल.~पहूर औरंगाबाद महामार्गावर कारला झालेल्या अपघातात कारचा पत्रा कापून जखमी सचिन यांना बाहेर काढताना युवक तर दुसऱ्या छायाचित्रात जखमी विर काकरवाल.