कार व मालवाहू वाहनाच्या धडकेत चार मजूर जखमी
By admin | Published: June 3, 2017 02:18 PM2017-06-03T14:18:37+5:302017-06-03T14:18:37+5:30
शनिवारी सकाळी दहा वाजता शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रापासून काही अंतरावर झाला
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - कार व मालवाहू वाहनांची समोरासमोर धडक होऊन कमळगाव, ता.चोपडा येथील विट भट्टीवर काम करणारे 4 मजूर व 1 लहान मुलगा जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजता शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रापासून काही अंतरावर झाला. जखमींना गावक:यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असलेले ए.ए.तडवी हे शनिवारी सकाळी घाट नांद्रा, ता.कन्नड येथे कारने आजारी बहिणीला पाहण्यासाठी कुटुंबासह जात असताना शिरसोलीपासून काही अंतरावर समोरुन मजुर घेवून येणारी मालवाहू गाडी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात कार रस्त्याच्या कडेला गेली तर मालवाहू वाहन उलटले. त्यात रेखा बापू मालचे (वय 30), छोटू तुकाराम मालचे (वय 30),भाईदास देविदास सोनवणे (वय 32), नारायण बाबुराव कुंभार (वय 65) व ओम गोरख कुंभार (वय 10) सर्व रा.कमळगाव, ता.चोपडा हे जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच शिरसोली येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. हे सर्व मजूर बारामती येथे वीट भट्टीवर काम करतात. पावसाळा सुरु होत असल्याने ठेकेदाराने त्यांना घरार्पयत सोडण्याची व्यवस्था केली होती.