आगीत पिकाचे चार लाखांचे नुकसान

By admin | Published: April 24, 2017 01:15 AM2017-04-24T01:15:59+5:302017-04-24T01:15:59+5:30

भोकरीची घटना : नुकसान भरपाई मिळण्याची गरज

Four lakhs of damage to the crop in the fire | आगीत पिकाचे चार लाखांचे नुकसान

आगीत पिकाचे चार लाखांचे नुकसान

Next

वरखेडी ता. पाचोरा : भोकरी येथील सरपंच सलमाबी रशीद काकर व ग्रामपंचायत सदस्य रशीद शब्बीर काकर यांच्या लोहारी शिवारातील शेतात आग लागून पपई व केळीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे ते हवालदिल झाले असून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काकर यांची गट नं.175 व 176 मध्ये शेती असून त्यांनी येथे 52,000 केळीचे खोड लावले असून व्यापा:यासह त्यांचा सौदादेखील झालेला आहे. या केळीच्या शेताला नुकतीच दुपारी अकस्मात आग लागल्याने केळीचे 18,00  खोड व 80 नग 2:5 इंची पाईप जळाल्याने जवळजवळ साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचे रशीद शब्बीर यांनी म्हटले आहे. तलाठी जे.एस.चिंचोले  व कृषी अधिकारी व्ही.जी.चौधरी यांनी पंचनामा केला. पंचनाम्यावर माजी उपसरपंच इस्माईल अ.सलाम, हैदर भिकन, लोहारी येथील संदीप भास्कर पाटील व नाना दौलत पाटील यांच्या स्वाक्ष:या आहेत. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. 
                                                    (वार्ताहर)

Web Title: Four lakhs of damage to the crop in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.