दीपनगर प्रकल्पातून चार लाखांचे लोखंड चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:05 AM2019-02-02T02:05:53+5:302019-02-02T02:10:21+5:30

दीपनगर येथील ६६० मेगावॅॅट प्रकल्पाच्या आवारातून ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंड चोरीस गेल्याची फिर्याद मुकेश मोतीराम भोळे यांनी तालुका पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Four lakhs of iron stolen from Deepanagar project | दीपनगर प्रकल्पातून चार लाखांचे लोखंड चोरीस

दीपनगर प्रकल्पातून चार लाखांचे लोखंड चोरीस

Next
ठळक मुद्दे दीपनगरसह प्रकल्पात एकच खळबळ अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : तालुक्यातील दीपनगर येथील ६६० मेगावॅॅट प्रकल्पाच्या आवारातून ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंड चोरीस गेल्याची फिर्याद मुकेश मोतीराम भोळे यांनी तालुका पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, दिपनगर प्रकल्पामध्ये सध्या नवीन प्रकल्पाचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या आवारात ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान रात्री ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. २७ - ४८९१) मध्ये दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी ४ लाख १० हजार रुपये किमतीची लोखंडी आसारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे . या घटनेमुळे दीपनगरसह प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे . प्रकल्पात मोठा बंदोबस्त असतानाही चोरी झालीच कशी ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, चोरटे हे प्रकल्पांतर्गत काम करणारे आहेत का? बाहेरील आहे या संदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तपास पीएसआय करेवाड करीत आहेत.

Web Title:  Four lakhs of iron stolen from Deepanagar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.