महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:13+5:302021-05-23T04:15:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा ...

Four-laning of highway but what about the traffic congestion of Ajanta Chowfuli? | महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा पर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाण पुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुली जवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देखील पाठवण्यात आले आहे.

एका बाजुला औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रस्ता, एका बाजुला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अहोरात्र सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ असे अजिंठा चौफुलीचे चित्र आहे. दिवसाला या चौकातून किमान तीन ते चार हजार ट्रक ये जा करत असतात. त्याशिवाय औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी हा चौक ओलांडूनच आपल्या घरी जातात. तसेच या भागातूनच रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, सुप्रिम कॉलनी यासारख्या मोठ्या वसाहतीच्या भागांमध्ये जाता येते. मात्र तरीही येथे रहदारीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

गेल्या काही काळापासून येथे एक सर्कल तयार करून रहदारीला शिस्त लावली जाणार असल्याचे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. मात्र या चौकात रहदारीला शिस्त लावण्यासाठी सर्कल केले तर त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेतांना मोठी अडचण येणार असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला आहे.

मंदिर पाडले पण जागेचा अद्याप उपयोग नाही

अजिंठा चौकात कृष्ण मंदिर बांधण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपुर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे मंदिर अतिक्रमित असल्याने तोडले आणि ही जागा वळण रस्त्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. मात्र मंदिर तोडुन वर्षे उलटली तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वळण रस्ता बांधलेला नाही.

कोट -

अजिंठा चौफुलीतून दररोज तीन ते चार हजार ट्रक ये-जा करत असतात. तसेच दिवसभर अनेक वाहने देखील ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी आम्ही केलेली नाही. येथे सर्कल तयार केले जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सर्कल तयार केल्यावर अवजड वाहनांना वळण घेणे कठीण होईल - जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष जिल्हा मोटर ओनर्स आणि ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन, जळगाव

Web Title: Four-laning of highway but what about the traffic congestion of Ajanta Chowfuli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.