शेंदुर्णीजवळ चारचाकीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:08 AM2018-12-09T01:08:52+5:302018-12-09T01:11:02+5:30

शेंदुर्णीजवळील सोयगाव रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक चारचाकी गाडी संशयास्पद स्थितीत आढळल्याने या गाडीवर काही जणांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

 Four-legged stone crossing near Sengdurni | शेंदुर्णीजवळ चारचाकीवर दगडफेक

शेंदुर्णीजवळ चारचाकीवर दगडफेक

Next
ठळक मुद्देसोयगाव रस्त्यावर संशयास्पद स्थिती उभी होती चारचाकीगाडीच्या काचा फोडल्या, चालक उशीरा फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात

पहूर ता. जामनेर : शेंदुर्णीजवळील सोयगाव रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक चारचाकी गाडी संशयास्पद स्थितीत आढळल्याने या गाडीवर काही जणांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान, संबंधित गाडी व चालकाला पहूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले तथापि रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र संबंधित चालक तक्रार न देताच पहूर पोलिस स्टेशन मधून रात्री निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच १९ ए. एक्स ६५६१ क्रमांकाची चारचाकी गाडी शेंदूर्णीजवळील सोयगाव रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे काही लोकांनी गाडीवर चाल करून दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. व गाडीचालक स्वामी नारायण पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहे. सदर गाडीचा चालक हा जामनेर येथील रहिवासी असून जामनेर नगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी असल्याचे समजते. पैसे वाटण्यासाठी ही गाडी आली असेल या संशयावरून गाडीवर दगडफेक झाल्याचे कळते. दरम्यान, गाडी कोणत्या पक्षाच्या नेत्याची आहे . तसेच मारहाण करणारे कार्यकर्ते कोण होते ? हे स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि या घटनेमुळे शेंदुर्णीत तणावपूर्ण शांतता असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

तक्रार न देताच चालक गेला
मी तात्पुरता बदली चालक असून मला गाडी मालकाचे नाव माहित नाही.व गाडी कोणाची आहे हे पण माहित नाही. त्याचबरोबर कोणी मला मारले त्यांना मी ओळखत नाही .मला याबाबत काही तक्रार दाखल करायची नाही. असे संबंधित चालक स्वामी नारायण पाटील याने पहूर पोलिसांना सांगून तो येथून निघून गेला होता. रात्री उशिरा तो पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आला होता.

 

Web Title:  Four-legged stone crossing near Sengdurni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.