जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:14 PM2020-04-09T23:14:05+5:302020-04-09T23:14:26+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश ...

Four market committees in Jalgaon district ordered closure completely | जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश असताना तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाºया उपाययोजनांतर्गत बाजार समित्यांमधील गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी २० मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त जणांना प्रवेश नसावा तसेच टप्प्या-टप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असताना बाजार समित्यांमध्ये दररोज मोठी गर्दी होते. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालनही होत नसल्याचे समोर आले. 
हे प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जळगाव बाजार समितीमध्ये भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने पाच व्यापाºयांचे परवानेदेखील रद्द केले. तरीदेखील बाजार समित्यांमध्ये धान्य, भाजीपाला, फळे यांच्या खरेदी व विक्रीसाठी गर्दी कायम होती. 

त्यामुळे २० मार्च रोजीच्या आदेशाचे व सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जळगावसह अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी ९ एप्रिल रोजी दिले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Four market committees in Jalgaon district ordered closure completely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.