जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:33 PM2020-05-04T23:33:58+5:302020-05-04T23:34:20+5:30

जळगाव : जळगाव व अमळनेर येथील  रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले ...

Four more corona infected patients found in Jalgaon district today * | जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next

जळगाव : जळगाव व अमळनेर येथील  रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या चार व्यक्तीमध्ये 31, 43 व 60 वर्षीय महिलांचा तर 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. निगेटिव्ह व्यक्तीमध्ये 14 व्यक्ती या अमळनेर येथील तर दोन व्यक्ती जळगाव च्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 57 इतकी झाली आहे. त्यापैकी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: Four more corona infected patients found in Jalgaon district today *

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव