निंबोल दरोडा आणि गोळीबार प्रकरणी चार जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:25 PM2019-06-21T13:25:40+5:302019-06-21T13:26:07+5:30
गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे
जळगाव : निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.
निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत दरोडा टाकून सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात गोळीबार करणारे दोन्ही संशयित हल्लयानंतर पोलिसांच्या नाकाबंदीच्या भीतीने रावेर-मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
निंबोल येथील विजया बॅँकेत हेल्मेटधारी दोघांनी मंगळवारी प्रवेश केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एकाने सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत ते जागीच ठार झाले होते. या घटनेंतर दोन्ही संशयितांनी लागलीच दुचाकीवरुन पळ काढला. बॅँकेचा सायरन वाजल्याने नागरिक धावत येतील व पोलिसांचीही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी होऊ शकते याचा अंदाज घेऊन या संशयितांनी मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने दुचाकी नेली.