पाचोरा: शिक्षण संस्थेतील वादातून मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकासह चार जणांना सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 09:26 PM2022-02-03T21:26:32+5:302022-02-03T21:27:07+5:30

पाचोरा येथील माजी नगरसेवकासह चार जणांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

four persons including a former corporator were given hard labor in a case of beating in a dispute in an educational institution in pachora | पाचोरा: शिक्षण संस्थेतील वादातून मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकासह चार जणांना सक्तमजुरी

पाचोरा: शिक्षण संस्थेतील वादातून मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकासह चार जणांना सक्तमजुरी

googlenewsNext

पाचोरा जि.जळगाव: शिक्षण संस्थेतील वादातून मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील माजी नगरसेवकासह चार जणांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

पाचोरा येथील न्या. एस.के. सिद्दीकी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. माजी नगरसेवक आयुब रशिद बागवान, शकील खान बशीर खान, जमील खान बशीर खान, शेर खान बशीर खान अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.  २७ डिसेंबर २०१६ रोजी पाचोरा येथील अँग्लो उर्दू हायस्कूल या संस्थेत सभासद करून घेण्याच्या वादातून शरीफ युसुफ बागवान यास वरील चारही जणांनी मारहाण केली होती.  शरीफ  यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

 पाचोरा येथील न्यायालयात हा खटला चालला. सरकारतर्फे ॲड. रमेश खंडू माने यांनी बाजू मांडली.  तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार पृथ्वीराज कुमावत व पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ दीपक पाटील यांनी काम पाहिले.
 

Web Title: four persons including a former corporator were given hard labor in a case of beating in a dispute in an educational institution in pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.