गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे नेणाऱ्या पुण्यातील चार जणांना अमळनेरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:17 AM2021-07-21T10:17:48+5:302021-07-21T10:18:32+5:30
पिस्तूल आणि वाहनासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे.
अमळनेर : बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या चौघांना अमळनेर पोलिसांनी स्टेट बँकेजवल पकडून अटक केली आहे. पिस्तूल व वाहनसह साडे दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी २० रोजी रात्री स्टेट बँकेजवल सुनील हटकर , भटुसिह तोमर , रवी पाटील , दीपक माळी, राजेंद्र कोठावदे , विलास बागुल , मधुकर पाटील या पोलीसाना तैनात करून चारचाकी वाहन क्रमांक एम एच १२ टी डी ६७९१ हिला अडवले असता त्यात पंकज उर्फ बंटी शंकर भूमकर वय २५ रा नरेअंबेगाव जि पुणे , मनोज उर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड वय २५ रा चिखली जाधववाडी हवेली जि पुणे , ओंकार प्रकाश नाने वय २८ रा द्वारका निवास ,इंद्रायणी नगर ,भोसरी , पुणे , प्रशांत शिवाजी गुरव वय ३८ रा संत तुकाराम नगर , भोसरी पुणे हे चौघे आढळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ बेकायदा बाळगलेले , पिस्तुल , मॅगझीन तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार रुपयांचे शस्त्र व १० लाख रुपये किमतीची कार , १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १० लाख ४० हजराचा माल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला शस्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.