पिकनिकला गेलेले चौघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

By सुनील पाटील | Published: September 11, 2022 07:47 PM2022-09-11T19:47:31+5:302022-09-11T19:47:45+5:30

भाऊ-बहिणीसह तिघं बचावले, तीन दिवसातील दुसरी घटना

Four picnickers drowned in lake; one missing in Jalgaon | पिकनिकला गेलेले चौघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

पिकनिकला गेलेले चौघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

googlenewsNext

जळगाव: रविवारची सुट्टी म्हणून कांताई बंधाऱ्याकडे पिकनिकला गेलेले योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४) या बहिण भावासह समीक्षा विपीन शिरोडकर (वय १७) व नयन योगेश निंबाळकर (वय १७) सर्व रा. मिथीला अपार्टमेंट, दूध फेडरेशन, जळगाव) ही चार मुले दुपारी पाण्यात बुडाले. नयन वगळता अन्य तिघांना वाचविण्यात यश आले आहे. नयनचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. तिघांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथीला अपार्टमेंटमधील १२ ते १५ मुलं-मुली सण्डे पिकनीक म्हणून तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाऱ्यावर फिरायला गेले. तेथे फिरणं झाल्यानंतर गिरणा नदीत नागाई जोगाई मंदिर परिसरात पाण्यात उतरले. तेथे फोटो सेशन केले. पाण्याचा अंदाज न आल्याने योगीता व सागर या बहिण भावासह समीक्षा शिरोडकर व नयन निंबाळकर हे पाण्यात बुडाले. हा प्रकार इतर सहकारी मित्रांनी चौघांनी वाचविण्याचा प्रयत्न केले.

त्यात तिघांना बाहेर काढण्यात यश आले तर नयन वाहून गेला. मनपा व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने नयनचा उशिरापर्यंत शोध सुरु होता. दोन दिवसापूर्वीच कांताई बंधाऱ्यावर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या भगवान नामदेव राठोड (वय १८, रा. समता नगर) या तरुणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर लागलीच आज पुन्हा चार मुलं बुडाले.

Web Title: Four picnickers drowned in lake; one missing in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.