चार गंभीर आजार, ऑक्सिजन पातळी ८० तरी कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:32+5:302021-05-15T04:15:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हाडांचा ठिसूळपणा, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित एसएलई, रक्तक्षय, थॅलेसेमिया अशा गंभीर आजाराशी लढत असतानाच ...

Four serious illnesses, oxygen level 80, but overcome corona | चार गंभीर आजार, ऑक्सिजन पातळी ८० तरी कोरोनावर मात

चार गंभीर आजार, ऑक्सिजन पातळी ८० तरी कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हाडांचा ठिसूळपणा, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित एसएलई, रक्तक्षय, थॅलेसेमिया अशा गंभीर आजाराशी लढत असतानाच बोदवड येथील एका २५ वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली. ऑक्सिजन पातळी ८० वर आलेली, हिमोग्लोबिन दीडवर आलेले, अशा कठीण व बिकट परिस्थितीत जीएमसीत डॉक्टरांच्या पथकाने या महिलेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. शुक्रवारी अक्षय तृतीयेचे औचित्य साधून या महिलेला साडी व भेटवस्तू देऊन डिस्चर्ज देण्यात आला.

बोदवड येथील एका पानटपरी चालकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात त्यांच्या २५ वर्षीय पत्नीला कोरोनाचे निदान झाले होते. आधीच्या आजारांचे उपचार थांबलेले असताना शिवाय ही महिला अडीच महिन्यांची गर्भवती होती. बोदवड ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात होते. ३ मे रोजी महिलेचे हिमोग्लोबिन कमी होऊन प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय बनसोडे यांच्या टीमने उपचार सुरू केले. तपासणी केल्यावर तिचे हिमोग्लोबिन दीड एचबी निघाले. तिला उभे राहता येणे अशक्य झाले होते. ऑक्सिजन स्थिती ८० होती. श्वासोच्छ्वासाचा वेग जास्त असल्याने धाप लागत होती. गंभीर अवस्थेत ती दाखल झाली.

रक्ताच्या सहा पिशव्या

महिलेला रक्ताच्या सहा पिशव्या लावाव्या लागल्या. अतिदक्षता विभागात दाखल करून तिची स्थिती नियंत्रणात आणली. तसेच, पोटातील गर्भाचीदेखील तपासणी केल्यानंतर तो अडीच महिन्याचा मृत असल्याचे दिसले. त्यामुळे हा गर्भ सुरक्षित पद्धतीने काढून टाकण्यात आला. आता या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिला पुढील २ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर शुक्रवारी १४ रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनावर मात आणि सन्मान

यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वतीने अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते सदर महिलेला साडी, गुळाची चिक्की आणि आखाजीनिमित्त आंबे भेट देत तिला सन्मानाने निरोप देण्यात आला. प्रसंगी वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ.संजय बनसोडे, अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल उपस्थित होते. डॉ. रोहन केळकर, डॉ.शीतल ताटे, डॉ.सुधीर पवनकर, डॉ.राजश्री येसगे, डॉ. प्रियांका शेटे, अधिपरिचारिका विमल चौधरी, राजश्री अढाळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Four serious illnesses, oxygen level 80, but overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.