अस्वच्छता आढळल्याने जळगावात चार दुकानदारांना दंड
By admin | Published: July 17, 2017 12:27 PM2017-07-17T12:27:10+5:302017-07-17T12:27:10+5:30
शहरातील गिरणा टाकी, रामानंद नगर, मायादेवी नगर, भुषण कॉलनी, सुयोग नगर, मू.जे.महाविद्यालय परिसर,गुरुकुल सोसायटी परिसरात जावून स्वच्छतेची पाहणी केली.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 17 - सलग चौथ्यादिवशी देखील मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी शहरातील विविध भागांमध्ये जावून स्वच्छतेची पाहणी केली. पाहणी दरम्यान शहरातील भुषण कॉलनी व गुरुकुल सोसायटी लगत असलेल्या दुकानांसमोर अस्वच्छता आढळल्याने चार दुकानदारांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रविावारी सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान मनपा आयुक्तांनी शहरातील गिरणा टाकी, रामानंद नगर, मायादेवी नगर, भुषण कॉलनी, सुयोग नगर, मू.जे.महाविद्यालय परिसर,गुरुकुल सोसायटी परिसरात जावून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, नगरसेवक नितीन बरडे, रवींद्र पाटील यांच्यासह मनपाचे आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. आयुक्तांनी सकाळी 7 वाजता गिरणा टाकी परिसरापासून आपल्या पाहणी दौ:याला सुरुवात केली. तसेच भुषण कॉलनी, सुयोग कॉलनी त रहिवाश्यांची देखील चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.