चौथ्या फेरीसाठी २१३ विद्यार्थी ठरले पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:13 PM2019-09-10T22:13:52+5:302019-09-10T22:14:04+5:30
जळगाव - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात ...
जळगाव- शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात आला़ यामध्ये रिक्त जागांवर २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यांच्या पालकांना एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आलेले आहेत़
आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ३ हजार ७१७ जागांपैकी २ हजार ६९९ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते तर १ हजार १८ जागा रिक्त राहिल्या होत्या़ त्यानंतर तब्बल ४४ दिवसांच्या खंडानंतर शिक्षण विभागाला चौथी फेरी घेण्यासाठी मुहूर्त सापडला़ त्यानुसार सोमवारी पुणे येथे चौथी फेरीची सोडत काढण्यात आली़ त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले आहे़ दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांना एसएमएस मिळाले नाही, त्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन पाल्य पात्र ठरला आहे, की नाही पडताळणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे़ दरम्यान, पालकांना बुधवारपासून विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे़ २१ सप्टेंबरपर्यंत पालकांना मुदत देण्यात आली आहे़