जळगाव जि़प़समोर चार शिक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:24 PM2020-03-15T12:24:56+5:302020-03-15T12:25:32+5:30
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील झिपरू अण्णा विद्यालयाच्या चार शिक्षकांनी संस्थाचालकांनी अचानक कामावरून काढून टाकल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर ...
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील झिपरू अण्णा विद्यालयाच्या चार शिक्षकांनी संस्थाचालकांनी अचानक कामावरून काढून टाकल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर शनिवारी उपोषण केले.
शिक्षक शुभम पाटील,राहुल जाधव, शिक्षिका काजल राजपूत पदमा राठोड हे शिक्षक उपोषणाला बसले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे का, झिपरू अण्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी त्यांना कर्तव्य बजावण्यापासून मज्जाव केला व अप्रमाणित करून शाळेतून हाकलून लावले कुठलेही लेखी आदेश न देता नऊ महिन्यांपासून सेवेपासून वंचित ठेवले आहे़ शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठलाही न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषण पुकारल्याचे त्यांनी म्ळटले आहे़ सेवेत रूजू झाल्यापासून संस्थाचालकांनी वेतन दिलेले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे़ संस्थाचालकांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे़