चारचाकीला जागाच मिळेना; घर, दुकानांसमोर पार्कींगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:47+5:302021-02-17T04:21:47+5:30

दरम्यान, रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच नो पार्कींगमध्ये वाहने पार्कींग करणाऱ्या ११ हजार ९४७ जणांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली ...

The four-wheeler could not find a place; Home, parking in front of shops invites accidents | चारचाकीला जागाच मिळेना; घर, दुकानांसमोर पार्कींगमुळे अपघाताला निमंत्रण

चारचाकीला जागाच मिळेना; घर, दुकानांसमोर पार्कींगमुळे अपघाताला निमंत्रण

Next

दरम्यान, रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच नो पार्कींगमध्ये वाहने पार्कींग करणाऱ्या ११ हजार ९४७ जणांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना २३ लाख ८ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. शहरातील बाजार संकुलातही पार्कींगची समस्या कायम आहे. महापालिकेकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यात किंवा रस्त्याचा बाजुला वाहन लावले की अपघात होण्यासह किरकोळ धक्का लागला तरी त्यावरुन वादाला तोंड फुटते. एखाद्या दुकानासमोर वाहन पार्कींग केले की तेथेही वादाला तोंड फुटते. दुकानदार स्वत:ची वाहने दुकानासमोर पार्कींग करतात, मात्र बाहेरील व्यक्तीला पार्कींग करु दिले जात नाही. दुकानासमोरील जागा दुकानमालकाची नसतानाही त्यांच्याकडून हक्क दाखविला जातो, दुसरीकडे मनपा पार्कींगची सोय करीत नाही. अशातच पोलिसांकडून रहदारीस अडथळा निर्माण केल्याची कारवाई केली जाते.

शहराची लोकसंख्या : ५ ४२ ७६४

जिल्ह्यातील दुचाकीची संख्या : ४७४९१४

जिल्ह्यातील चारचाकीची संख्या : ५३८०४१

...तर वाहनमालकांवर कारवाई

१) मुख्य रस्ता तसेच घर व दुकानांना लागून वाहन पार्कींग करुन रहदारीला अडथळा ठरत असेल तर मोटार वाहन कलम १२२/१७७ नुसार वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात अशा २ हजार ४०८ वाहनांवर शहरात कारवाई झाली असून त्यांना ४ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे.

२) बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून गर्दी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत रहावी म्हणून पार्कींग झोन आखून दिलेले आहेत. फुले मार्केट, गोलाणी मार्केट व सुभाष चौक आदी ठिकाणी शहरात नो पार्कींग झोन आखण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहन पार्कींग केली तर वाहनधारकाकडून दोनशे रुपये दंड आकारला जातो.

सुभाष चौक जास्त त्रासदायक

सुभाष चौक तसेच मनपा ते फुले मार्केट या भागात वाहन पार्कींगला जागाच नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर चारचाकी व दुचाकी पार्कींग करतात तर सुभाष चौक परिसरात रहिवाशी वस्तीही आहे, त्यामुळे रहिवाशांचीही वाहने असतात. ते आपल्या घराबाहेर रस्त्याला लागून वाहने पार्कींग करतात. आधीत अरुंद रस्ते, त्यात वाहनांचा अडथळा यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

Web Title: The four-wheeler could not find a place; Home, parking in front of shops invites accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.