जळगाव जिल्ह्यात चार वर्षांचा ग्राम आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:16 PM2018-02-28T12:16:12+5:302018-02-28T12:16:12+5:30

१४व्या वित्त आयोगाचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना

A four year old village plan is prepared | जळगाव जिल्ह्यात चार वर्षांचा ग्राम आराखडा तयार

जळगाव जिल्ह्यात चार वर्षांचा ग्राम आराखडा तयार

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतली बैठकवार्डसभा, ग्रामसभा, शिवार फेरी इत्यादी कामे ठरविण्यात आले

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी केंद्राकडून थेट ग्रामपं़चायतींना १४व्या वित्त आयोगाचा निधी दिला जात असून यासाठी प्रत्येक गावाच्या विकासासाठी २०१६ ते २०२० या चार वर्षांचा ग्राम आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१६ - २०१७ साठी आलेला निधी मार्च महिन्यापर्यंत खर्च करावा व आराखड्यातील कामे करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्या.
‘आमचे गाव आमचा विकास’ अंतर्गत जिल्हा बैठक २७ रोजी जिल्हा परिषदेत सीईओंच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत १४व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. २०१६-२०१७ च्या आराखड्यात घेण्यात आलेली कामे ‘प्लॅन प्लस’मध्ये टाकून माहिती भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच आगामी वर्षात घ्यावयाची कामेदेखील प्लॅनमध्ये टाकावी अशा सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या. आराखड्यासाठी यापूर्वीच गावात कोणती विकास कामे करावयाची आहेत, याचे नियोजन तयार करण्यात आले असून यासाठी वार्डसभा, ग्रामसभा, शिवार फेरी इत्यादी कामे ठरविण्यात आले आहे.

Web Title: A four year old village plan is prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.