खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जळगावात आरोपीला चार वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:46 PM2018-12-21T16:46:21+5:302018-12-21T16:48:26+5:30

लग्नाच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नवल रजाना बारेला (वय ३५, रा.आसोदा, मुळ रा. शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्या डोक्यात फावडा मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मिश्री शंकर बारेला (वय २४ रा. फुपनगरी, ता.जळगाव, मुळ रा.शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन) याला न्यायालयाने गुरुवारी ४ वर्ष सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

Four years of imprisonment for the accused in Jalgaon in Jalgaon | खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जळगावात आरोपीला चार वर्ष सक्तमजुरी

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जळगावात आरोपीला चार वर्ष सक्तमजुरी

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्हा न्यायालयाने दिला निकालवर्षभरातच लागला निकालअशिक्षित लोकांची साक्ष ठरली महत्वपूर्ण

जळगाव : लग्नाच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नवल रजाना बारेला (वय ३५, रा.आसोदा, मुळ रा. शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्या डोक्यात फावडा मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मिश्री शंकर बारेला (वय २४ रा. फुपनगरी, ता.जळगाव, मुळ रा.शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन) याला न्यायालयाने गुरुवारी ४ वर्ष सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
आसोदा येथे २९ जानेवारी २०१८ रोजी मध्यरात्री गावाच्या बाहेर गॅस व पेट्रोल पंपाच्या बाजुला मोकळ्या जागेत विक्रम देवसिंग बारेला यांच्याकडे मुलगी प्रियंका हिच्या लग्नानिमित्त रात्री पावरी नाचगाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मिश्री शंकर बारेला याने नवल याला बायकोच्या नावाने शिवीगाळ केली. याबाबत नवल याने मिश्री याला जाब विचारला असता त्याने जवळच असलेला फावडा उचलून नवल याच्या डोक्यात टाकला होता. याप्रकरणी पोलीस पाटील आनंदा सिताराम बिºहाडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला मिश्री याच्याविरुध्द ३० जानेवारी २०१८ रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले. विक्रम बारेला, त्यांचा मुलगा भोलासिंग बारेला व जखमी नवल बारेला असे तिन्ही जण अशिक्षित असतानाही त्यांनी दिलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली. त्याशिवाय पोलीस पाटील आनंदा बिºहाडे, तपासाधिकारी बी.डी.पाटील व इतरांच्या साक्षी झाल्या. सरकारतर्फे अ‍ॅड.सुरेंद्र काबरा यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. बचावपक्षातर्फे अ‍ॅड.केतन सोनार यांनी काम पाहिले.

Web Title: Four years of imprisonment for the accused in Jalgaon in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.