चार वर्षात नंदुरबार जिल्हा कुपोषणमुक्त!
By admin | Published: January 17, 2016 12:08 AM2016-01-17T00:08:40+5:302016-01-17T00:08:40+5:30
नंदुरबार : जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प आरोग्यमंत्री दीपक सावंत व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
नंदुरबार : जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प आरोग्यमंत्री दीपक सावंत व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. भूषा व धडगाव येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत एक कोटी 37 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या तरंगत्या रुग्णवाहिकेचे (वॉटर अॅम्ब्युलन्स) लोकार्पण सरदार सरोवरच्या बॅकवॉटर क्षेत्रात येणा:या भूषा या ठिकाणी शनिवारी सकाळी करण्यात आले. त्या वेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत व आदित्य ठाकरे यांनी हा संकल्प केला. आरोग्याचा लेखाजोखा त्यांनी काही आंदोलक संघटना आणि प्रशासनाकडून घेतला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील आणि या क्षेत्रात अभ्यास असलेल्या स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. भौगोलिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पोहचविण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. -वृत्त/हॅलो