अमळनेरातील गांधलीपुरा भागातून चार तरूणी ताब्यात
By admin | Published: May 23, 2017 12:51 PM2017-05-23T12:51:36+5:302017-05-23T12:51:36+5:30
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.23- येथील गांधलीपुरा भागातील अवैध व्यवसाय करणा:या वस्तीवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून चार तरूणी ताब्यात घेण्यात आल्या. ही कारवाई सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
रेस्कु फाऊंडेशन कांदीवली मुंबईच्या दिपेश टॅंक, व मेहंदिया रिजवी यांना अमळनेरात अल्पवयीन मुलींकडून अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन तक्रार केली.
विनयकुमार चौबे यांनी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील, अनमोल पटेल, मिलींद भामरे, रेखा ईशी, नाना चित्ते, युवराज नाईक यांच्या पथकाने सोमवारी रात्री या वस्तीवर छापा टाकला. मात्र पोलीस येत असल्याची खबर यापूर्वीच मिळाल्याने, तेथील घरांना कुलूप लावून त्या गायब झाल्या. दरम्यान त्या परिसरात चार तरूणी आढळून आल्या. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान त्या तरूणी शालेय व महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तथ्य आढळल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले.