वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चौथ्यांदा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:59 AM2020-08-18T03:59:08+5:302020-08-18T03:59:13+5:30

एकीकडे आयएएस अधिका-यांच्या बदल्या होत असताना राष्ट्रवादीच्या गृहखात्यातील सुंदोपसुंदीमुळे बदल्या वारंवार रखडत आहेत.

Fourth extension for transfer of senior police officers | वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चौथ्यांदा मुदतवाढ

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चौथ्यांदा मुदतवाढ

Next

सुनील पाटील 
जळगाव : आयपीएस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागला असून चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ५ सप्टेंबरला बदल्यांबाबत निर्णय होणार आहे. एकीकडे आयएएस अधिका-यांच्या बदल्या होत असताना राष्ट्रवादीच्या गृहखात्यातील सुंदोपसुंदीमुळे बदल्या वारंवार रखडत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच आयएएस व आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या होतात. मात्र विशिष्ट अधिकाºयासाठी होणारा आग्रह बदल्यांना अडथळा ठरत आहे. गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महानिरीक्षक, आयुक्त व पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आधी १५ आॅगस्ट आणि गणेशोत्सव बंदोबस्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे बदली व बढतीची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले़ बैठकीनंतर दुसºयाच दिवशी बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली.

Web Title: Fourth extension for transfer of senior police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.