चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा २२ रोजी राज्य मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:43 PM2019-12-16T12:43:32+5:302019-12-16T12:43:46+5:30
जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी ...
जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी मेळावा होणार आहे.
राज्यातील ३२ जिल्ह्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संघटनांत्मक बांधणीसंदर्भात तसेच मागण्यांच्या लढ्याला मूर्त रूप देऊन एका शाश्वत विचारांची संघटना तयार करण्याचा मनोदय राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीनेही या राज्यव्यापी मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.
यामध्ये आपल्या विविध प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकवटले असून या मेळाव्यात या विविध मागण्या पुन्हा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सर्व कर्मचाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक विद्यालय पथराडचे रवींद्र नानाजी पाटील व भुसावळचे मनोज पाटील यांनी केले आहे.