मेहुणबारे येथे रविवारी चौथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:04 PM2017-11-07T17:04:45+5:302017-11-07T17:14:15+5:30

राज्यभरातील आदिवासी साहित्यींकांची राहणार उपस्थिती

Fourth State-level Tribal Literature Convention on Sunday in Mehunabare | मेहुणबारे येथे रविवारी चौथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन

मेहुणबारे येथे रविवारी चौथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देचार सत्रात होणार आदिवासी साहित्य संमेलनकथाकथन, परिसंवादाचे आयोजनराज्यभरातील आदिवासी कवी तसेच साहित्यीकांची उपस्थिती.

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव: दि. ७ : आदिवासी साहित्य अकादमी आणि क्रांतिवीर उमाजी नाईक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार १२ रविवार रोजी मेहुणबारे येथे संत शंकर महाराज (भील) साहित्य नगरीत होत आहे. संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी यानिमित्ताने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक व कथाकार सुनिल गायकवाड यांनी दिली.
मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या आवारात हे एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे. पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणार आहेत. रविवारी सकाळी साडेसात वाजता ग्रंथ दिंडीने सुरुवात होऊन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी प्र.दे.चे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. स्वागताध्यक्ष जि.प.सदस्या मोहिनी अनिल गायकवाड आहेत. कवी वाहरु सोनवणे, डॉ. संजय लोहरे प्रमुख अतिथी असतील.
साहित्य संमेलनात दुपारच्या सत्रात कुसुम आलम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. डॉ. संजय लोहकरे, डॉ.लता पवार, प्रा. रामदास गिळंदे, लालसू नागोरा (गडचिरोली) हे सहभाग घेतील.
तिसरे सत्र दुपारी अडीच वाजता सुरु होईल. यात कथाथकन असेल. प्राचार्य विश्वास पाडोळसे यांच्या अध्यक्षतेखाली संजय दोबाडे, सुनिल गायकवाड, डॉ. वाल्मिक अहिरे, विश्राम वळवी सहभागी होतील.
चौथ्या सत्रात साडेतीन वाजता प्राचार्य शिवाजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. यात राज्यभरातील कवींचा सहभाग असेल. कवी दिनेश चव्हाण, गौतमकुमार निकम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

Web Title: Fourth State-level Tribal Literature Convention on Sunday in Mehunabare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.