भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर लवकरच होणार रेल्वेचा चौथा बोगदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:37 PM2018-10-20T14:37:26+5:302018-10-20T14:38:20+5:30
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आमदार संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने नुकतीच त्यांच्या निवासस्थानी शहरातील विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीस पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, पालिकेचे पंकज पन्हाळे उपस्थित होते.
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आमदार संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने नुकतीच त्यांच्या निवासस्थानी शहरातील विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक झाली.
बैठकीस पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, पालिकेचे पंकज पन्हाळे उपस्थित होते.
शहरात विविध ठिकाणी विकासाच्या माध्यमातून होणार असलेल्या बदलांवर चर्चा करण्यात आली. १ आॅक्टोबर रोजी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जळगाव दौरा होता. या दौऱ्यात मुनगंटीवार भुसावळ येथे आले असता, आमदार सावकारे यांनी शहरातील विकासकामांबाबत मुनगंटीवार यांना माहिती दिली. नगरविकास खात्याकडून या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले . विभागात ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेला यावल रोडवरील सेंट अलायसेस शाळेजवळची रेल्वेची दीड लाख स्क्वेअर फूट जागा नवीन इमारतीसाठी देण्यात येणार आहे. तसेच बाजूलाच रेल्वे जीआरपी पोलीस कर्मचाºयांची वसाहत बांधण्यात येणार आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेच्या चौथ्या बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बोगद्याजवळील व्यावसायिकांची लवकरच बैठक घेण्यात येऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले जाणार आहे.
शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे ते बस स्टॅण्ड रस्ता हा २४ मीटरचा होणार आहे. पुरातन हनुमान मंदिराचाही जीर्णोद्धार होणार असून रेल्वेची भिंत तोडून रस्ता मोठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठ ते अमर स्टोअर्स आणि नंतर बसस्टॅण्ड, असा रस्ता तयार होणार आहे.
बस स्टॅण्डजवळील रेल्वे गार्डलाईन मार्ग २४ मीटरचा होणार असल्याने येथील रेल्वे कर्मचाºयांची घरे तोडून या ठिकाणी नवीन मोठा मार्ग थेट वरणगाव रोडवर असलेल्या एबीसी शाळेजवळ जोडण्यात येणार आहे. शहरातल बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यासाठी ‘टू अॅण्ड लिफ्ट‘द्वारे रस्त्यात पार्किंग केलेल्या बेशिस्त वाहनांना उचलून रस्ते मोकळा श्वास घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे.