चौपदरीकरण अडीच वर्षात होणार!
By admin | Published: February 1, 2017 12:11 AM2017-02-01T00:11:05+5:302017-02-01T00:11:05+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा : सपाटीकरणासह भराव मजबुतीकरणाच्या कामास प्राधान्य
धुळे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या फागणे ते नवापूर (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती मिळाली असून सध्या संपादित जमिनीचे सपाटीकरण व भरावाच्या मजबुतीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे. या टप्प्याचे काम 910 दिवसांत म्हणजे सुमारे अडीच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसा करार फागणे-सोनगड एक्स्प्रेस वे लि. कंपनीशी करण्यात आला आहे. परंतु लवकरात लवकर मुदतीपूर्वी काम पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रय} असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर-सुरत यांना जोडणा:या या महामार्गाच्या जिल्ह्यातील 140 कि.मी.चे टप्प्याचे चौपदरीकरण या अंतर्गत करण्यात येणार आहे. नागरिकांना सुटसुटीत, योग्य, ‘कन्ङोशन फ्री’ व योग्य गतीने वाहतूक जाईल, असा उत्कृष्ट दर्जाचा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग देशासाठी अर्पण करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधील आहे, असेही सूत्र म्हणाले.
फागणे ते नवापूर या टप्प्याच्या कामावर देखरेख (सुपरव्हिजन) ठेवण्यासाठी कन्सल्टिंग इंजिनियरिंग ग्रुप (सीईजी) नावाची स्वतंत्र अभियंता (इंजिनियरिंग) कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या दिल्ली स्थित कार्यालयातून ही नियुक्ती झाली असून कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चौपदरीकरणाच्या प्राथमिक टप्प्यात मजबुतीकरणाचे (ग्राऊंड कॉम्पॅक) काम केले जात आहे. तसेच महामार्गाच्या वरच्या (पेवमेंट डिझाईन) थराचे काम सुरू असून त्यासाठी भराव टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. साधारणत: 140 पैकी 80 कि.मी. क्षेत्रात सध्या हे काम सुरू आहे.
80 टक्के संपादित जमिनीचा ताबा मिळाल्याने काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले. मुरूम, दगड व गिट्टी यांचा वापर करून तसेच टॅँकरने पाणी शिंपडून त्यावर रोलिंग करून थरांचे मजबुतीकरणाचे काम गतीने करण्यात येत आहे.
भविष्यातील ‘सिक्स लेन’चीही तजवीज!
चौपदरीकरणासाठी भूसंपादन करताना भविष्यातील सहापदरीकरणासाठीही जागेची तजवीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे जाऊन महामार्ग सहापदरी करण्याची गरज पडल्यास लगेच कामाला सुरुवात करता येऊ शकेल. तेव्हा भूसंपादन करण्याची गरज राहणार नाही. आताच भविष्याचा विचार करून भूसंपादन करण्यात आले आहे.