समांतर रस्ते डीपीआरमध्ये चौथ्यांदा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:48 PM2018-04-01T15:48:56+5:302018-04-01T15:48:56+5:30
सततच्या घोळामुळे कामाला होतोय विलंब
जळगाव : शहरवासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामाच्या डीपीआरमध्ये आता चौथ्यांदा बदल झाला आहे. त्यामुळे केवळ प्रकल्प अहवाल बनविण्याचाच घोळ सुरू असून प्रत्यक्ष कामाला मात्र त्यामुळे विलंब होत आहे.
डीपीआर ४४४ कोटींवरून १३८ कोटींवर
तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी समांतर रस्त्यांबाबत ‘नही’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४४४ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यात समांतर रस्त्यांसोबतच सध्याच्या महामार्गावरून उड्डाणपूल, भुयारी मार्गही प्रस्तावित होते. हा डीपीआर मंजुरीसाठी नागपूर कार्यालयात व तेथून दिल्ली कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ १०० कोटींचा निधीच मंजूर झाला होता.
दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील महिन्यात झालेल्या बैठकीत शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्ते व भुयारी मार्ग आदी कामांसाठी १०० कोटींऐवजी त्यात आणखी २५ कोटींची भर घालून १२५ कोटींची मंजुरी देण्यात आली. त्यामुळे १०० कोटींच्या निधीतून तयार होत असलेल्या प्रकल्प अहवालात बदल करून १२५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा समावेश करण्याचे काम सुरू झाले. मात्र प्रत्यक्षात १३९ कोटींचा डीपीआर (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या (नही) नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे २३ मार्च रोजी सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.
आश्वासनाच्या कालावधीत काम सुरू करण्यास विलंब
‘नही’कडे प्राप्त १०० कोटींच्या निधीतून तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीने रास्ता रोको आंदोलन केले होते, तर डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या ‘जळगाव फर्स्ट’ने पत्र पाठविण्याची मोहीम राबविली होती. जिल्हाधिकाºयांनी समांतर रस्ते कृती समितीला दिलेल्या लेखी आश्वासनात समांतर रस्त्यांच्या कामाचा डीपीआर १५ फेब्रुवारीपर्यंत करून एप्रिल अखेर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर हा निधी १२५ कोटींचा झाला. तर आता १३८ कोटींचा डीपीआर प्रत्यक्षात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजूर निधी पेक्षा जास्त रक्कमेचा डीपीआर पाठविल्याने पुन्हा अडचणी निर्माण होऊन विलंब होऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
‘लोकमत’वृत्ताची दखल
‘लोकमत’ने मुख्यमंत्री दौºयाच्या पार्श्वभूमीवर समांतर रस्त्यांच्या डीपीआरबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांना टष्ट्वीट केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने हा डीपीआर मंजुरीसाठी पाठविला आहे.
‘नही’चे अधिकारी दडवताय माहिती
‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतलेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा विषय गंभीर असतानाही या अधिकाºयांना मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचेच अनुभवास येत आहे. महामार्ग चौपदरीकरण असो की, समांतर रस्ते माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास या अधिकाºयांनाच त्यास तोंड द्यावे लागणार आहे. ु