आरोग्यची भरती ऐनवेळी रद्द करून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:54+5:302021-09-27T04:16:54+5:30
रावेर : शासनात आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ स्तरातील कर्मचारी सेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी एक दिवसांपूर्वी रद्दबातल केल्याने लांब ...
रावेर : शासनात आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ स्तरातील कर्मचारी सेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी एक दिवसांपूर्वी रद्दबातल केल्याने लांब पल्ल्याच्या अंतरावर बसस्थानक तथा रेल्वेस्थानकावर मुक्कामी जाऊन पडलेल्या उमेदवारांची गैरसोय, हालअपेष्टा व फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजयुमोने निषेध नोंदवला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व दोन दिवसांत परीक्षा पुन्हा घोषित करण्यात यावी, असे निवेदन भाजयुमोतर्फे खासदार रक्षा खडसे, जि. प. अध्यक्ष रंजना पाटील व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, पं.स. सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, बेटी बचाओच्या जिल्हा संयोजिका सारिका चौहान, भाजप तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस. पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शिवाजी पाटील, माजी पं. स. उपसभापती महेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, बेटी बचाओच्या तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य योगिता वानखेडे, महिला आघाडीच्या रेखा बोंडे, पं. स. सदस्य पी.के. महाजन, माधुरी नेमाडे, जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, पराग पाटील, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष राहुल महाजन, विजय महाजन, ॲड. प्रवीण पाचपोहे, संजय माळी, राहुल पाटील, स्वप्नील पाटील, संजय महाजन, हर्षल पाटील, बाळू काकडे, संजय महाजन, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, खेमचंद्र धांडे, गिरीश पाटील, उपाध्यक्ष भूषण पाटील, निवृत्ती पाटील, मनोज धनगर, राजू पाटील, उमेश कोळी, हर्षल पाटील, रमाकांत महाजन व भाजयुमो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार रक्षा खडसेंनी तहसीलदारांना खडसावले
भाजप पदाधिकाऱ्यांचे असो वा कुठल्याही पक्षाचे निवेदन स्वीकारताना टाळाटाळ करून नायब तहसीलदारांना बाहेर निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवणे अनुचित आहे. निवेदन स्वीकारण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना खडसावले. पाच जणांखेरीज निवेदन स्वीकारण्यासाठी इन्कार करणाऱ्या तहसीलदार देवगुणे यांनी अखेर निवेदन स्वीकारले.