ठेकेदाराची ५६ लाखात फसवणूक, जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:53 PM2020-09-06T12:53:38+5:302020-09-06T12:54:05+5:30
जळगाव : एरंडोल येथील ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात दुसरे ठेकेदार विश्वंभर तायडे ...
जळगाव : एरंडोल येथील ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात दुसरे ठेकेदार विश्वंभर तायडे (रा.मलकापूर)व भुजल सर्वेक्षण विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक स्वप्निल पाटील या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने जलसंधारणाची कामे टेंडर काढून विश्वंभर तायडे रा.मलकापुर यांना दिली होती.त्यापैकी १ कोटी ४०लाख रुपयांची कामे करण्याचा उपठेका तायडे यांनी राजीव मणियार यांना दिला होता. त्या बाबतीत रितसर करारनामा करण्यात आला होता. तायडेसह भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ लिपिक स्वप्निल पाटील यांनी मणियार यांना भविष्य काळात नवीन कामे मिळतील, असा विश्वास देऊन चालू कामातील ५६ लाख रुपये देण्यास नकार देवून मणियार यांच्याकडून पैसे मिळाले आहे असे शपथपत्र करुन घेतले. याप्रकरणी राजीव मणियार यांच्या फिर्यादीवरुन तायडे व पाटील यांच्याविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे विश्वंभर तायडे व स्वप्निल पाटील यांनी न्या. आर. एन. हिवसे यांच्याकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो शनिवारी फेटाळण्यात आला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सूरज जहांगीर यांनी काम पाहिले.