शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याचे सांगत डॉक्टरांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:59+5:302021-05-23T04:15:59+5:30
जळगाव : बजाज फायनान्सद्वारे सात लाख रूपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर करून देण्याचे सांगत डॉ.अनुपम रमेश दंडगव्हाळ (रा.बाजार रोड, जळगाव) ...
जळगाव : बजाज फायनान्सद्वारे सात लाख रूपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर करून देण्याचे सांगत डॉ.अनुपम रमेश दंडगव्हाळ (रा.बाजार रोड, जळगाव) यांची तिघानी ६२ हजार ४९७ रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्वप्निल माणगांवरक, आर्या पाटील, संस्कृती राजे यांच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल, आर्या व संस्कृती यांनी डॉ.अनुपम दंडगव्हाळ यांना सात लाख रूपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर करून देण्याचे सांगत त्यांच्याकडून वेळोवेळी ६२ हजार ४९७ रूपये ऑनलाईन पध्दतीने डॉ. दंडगव्हाळ यांनी त्यांना पाठविले. मात्र, अद्यापर्यंत कुठलेही लोन मंजूर न झाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.