तब्बल १०० कोटीच्या खोट्या पावत्या बनवून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:43+5:302021-07-12T04:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआरचा अवसायक असताना जितेंद्र कंडारे याने पतसंस्थेच्या जवळपास १०० कोटी रुपयांपर्यंत कर्जाच्या रकमेत ठेवीदारांच्या ...

Fraud by making fake receipts of Rs 100 crore | तब्बल १०० कोटीच्या खोट्या पावत्या बनवून केली फसवणूक

तब्बल १०० कोटीच्या खोट्या पावत्या बनवून केली फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआरचा अवसायक असताना जितेंद्र कंडारे याने पतसंस्थेच्या जवळपास १०० कोटी रुपयांपर्यंत कर्जाच्या रकमेत ठेवीदारांच्या मुदत ठेवीच्या पावत्या अशा खोट्या नोंदी व खाटे बाॅण्ड तयार करून कर्जदाराने सर्व कर्ज परतफेड केले आहे व ठेवीदारांनाही त्यांची सर्व रक्कम परत केली आहे, असे भासवून त्यांना ही रक्कमच अदा केली नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

सात महिन्यांपासून फरार असलेल्या जितेंद्र कंडारे याला २८ जून रोजी पुणे पोलिसांनी इंदूर ये‌थून अटक केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयातून ट्रांझिट रिमांड घेऊन पुण्यात आणले. पुणे न्यायालयाने त्याला पहिल्या टप्प्यात दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असता, त्या दरम्यान झालेल्या चौकशीत कंडारेकडून अनेक बाबींचा उलगडा झालेला आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांतूनही अनेक पुरावे मिळून आले आहेत. ठेवी कुठे वर्ग करणार हे कंडारे व इतरांनी त्यांच्या सोयीनुसार कर्जदारांशी संगनमत करून ठरविले व ठेवीची पूर्ण रक्कम कर्जदारांच्या खात्यात वर्ग करून ठेवीदाराला सर्व रक्कम मिळाल्याच्या खोट्या नोंदी व कर्जदारानेही सर्व कर्जाची परतफेड केली, असे भासविण्याकरिता संगणकावरही खोट्या नोंदी घेतल्या आहेत. मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी ॲक्टचे कलम ९०चे नियम २९नुसार सर्व ठेवीदारांना समान न्यायतत्त्वाने पैसे वाटप करणे बंधनकारक व आवश्यक असतानाही कंडारे याने पदाचा दुरुपयोग करून कर्जदारांच्या सहाय्याने ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. कर्ज निरंक दाखला देण्यासाठीदेखील संशयितांनी रोखीने पैसे स्वीकारून अपहार केला आहे.

कंडारेच्या घरझडतीत ९ लाख रोख व २५ लाखांचे दागिने

सुरुवातीलाच पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी कंडारेची घरझडती घेतली तेव्हा घरात ९ लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम व २५ लाख २७ हजार ४३६ रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आढळून आले होते. त्याशिवाय २०२०मध्ये कंडारे व महावीर जैन एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात १४८ वेळा फोनवर बोलणे झालेले आहे.

Web Title: Fraud by making fake receipts of Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.