आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:27+5:302021-07-26T04:16:27+5:30

जळगाव : फरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास, महिन्याला आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे आमिष दाखवून रिंग रोड येथील तरुणाची ४ ...

Fraud of millions by luring attractive interest rates | आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Next

जळगाव : फरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास, महिन्याला आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे आमिष दाखवून रिंग रोड येथील तरुणाची ४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिंग रोड भागात स्वप्निल गोपाळ पाटील हे वास्तव्यास आहेत. १३ मे रोजी सोनल नामक महिलेने त्यांना फोन करून आपण इंदौर येथील मेगापॉवर कॉर्पोरेशन येथून बोलत असल्याचे सांगत, त्यांना फरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करावी, असे सांगितले. त्यावर महिला आकर्षक व्याजदर व परतावा देण्यात येईल, अशी ऑफर सांगितली. खात्री करण्यासाठी पाटील यांनीही कागदपत्रांविषयी विचारणा केली, तर महिलेने ज्या व्यक्तींनी गुंतवणूक केली, त्या व्यक्तींचे कागदपत्र त्यांना पाठवून त्यांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर, पाटील यांनी १४ मे ते ६ जून या कालावधीत वेळोवेळी एकूण ७ लाख ९९ हजार २०० रुपयांची रक्कम त्यांनी मेगापॉवर कॉर्पोरेशनच्या नावाने गुंतवणुकीसाठी पाठविले.

तीन लाखांच्या परताव्यानंतर संकेतस्थळही बंद

महिनाभरानंतर एका महिन्याचे व्याजदर व परताव्यापोटी एकूण ३ लाख रुपयांची रक्कम स्वप्निल पाटील यांच्या खात्यावर पाठविण्यात आली. काही दिवसांनी पाटील यांनी त्यांना आलेल्या संपर्क क्रमाकांवर संपर्क केला. मात्र, ते बंद आढळून आले. नंतर मेगापॉवर कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळ सर्च केल्यावर तेही त्यांना बंद आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत पोलिसांना संपूर्ण हकिकत सांगितली. नंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उर्वरित रक्कम ४ लाख ९९ हजार रुपयांची फसणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fraud of millions by luring attractive interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.