ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक

By विजय.सैतवाल | Published: October 17, 2023 05:22 PM2023-10-17T17:22:49+5:302023-10-17T17:23:23+5:30

वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणाऱ्याने मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली.

Fraud of 5 lakhs of woman forest guard by identifying her through the app | ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक

ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक

जळगाव : मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण करीत वनरक्षक रोशनी सहदेव झटाले (३३, चोपडा, जि. जळगाव) या महिलेची चार लाख ८९ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी  डॉ. सनिष अमितव पेमा असे नाव सांगणाऱ्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणाऱ्याने मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. महिलेसोबत चॅटिंग करीत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळे कारणं सांगत २६ जुलै २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३पर्यंत कल्पना कश्यम नावाच्या गाझियाबाद, उत्तरप्रदेशातील बँक खात्यावर एकूण चार लाख ८९ हजार रुपये ॲपद्वारे स्वीकारले. यात आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोशनी झटाले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डॉ. सनिष पेमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

Web Title: Fraud of 5 lakhs of woman forest guard by identifying her through the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.