शेतकऱ्याची दीड लाखांत फसवणूक; लासलगावच्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 10:08 PM2022-11-13T22:08:47+5:302022-11-13T22:09:18+5:30
त्यावेळी शेतकऱ्यास ५ हजार देण्यात आले. मात्र उर्वरित १, ४६००० हजार रुपये नंतर देतो असे सांगितले.
पी.आर. माळी
जळगाव - दीड लाखांचा कांदा खरेदी करुन त्याचे पैसे अदा केले नाहीत. यात लासलगावच्या व्यापाऱ्यांसह दोन जणांविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहार्डी येथील शेतकरी विजय रामदास सोनवणे यांनी एप्रिल २०२२ मध्ये एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा १७ टन कांदा हा गावातील उदय रमेश मोरे यांच्यावर विश्वास ठेवून त्याचे नातेवाईक आरोपी राजू वाल्मीक कदम (रा. लासलगांव ता. सटाणा जि. नाशिक) यांना विक्री केला.
त्यावेळी शेतकऱ्यास ५ हजार देण्यात आले. मात्र उर्वरित १, ४६००० हजार रुपये नंतर देतो असे सांगितले. परंतु दोघा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यास रक्कम देण्यास टाळाटाळ केली. विजय रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप राजपूत करीत आहेत.