प्राध्यापकाची सात लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:01 PM2020-10-26T17:01:00+5:302020-10-26T17:01:28+5:30
दोघांनी घातला गंडा : सोन्याचे सांगून दिले नकली मणी
प्राध्यापकाची सात लाखात फसवणूक
दोघांनी घातला गंडा : सोन्याचे सांगून दिले नकली मणी
यावल: खोदकाम करीत असतांना सापडलेल्या एक किलो सोन्याचे मणी बनवले असून ते स्वस्तात विकावयाचे असल्याचे सांगून दोन भामटयांनी येथील विरारनगरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची सात लाख रुपयांमध्ये फसवणुक केल्याची घटना २४ आक्टोबरला घडली. मणी घेतल्यांनंतर प्राध्यापकांनी ते सोनाराकडे तपासून पाहीले असता आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावरून रविवारी येथील पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील विरार नगरातील रहीवासी तथा कला वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एस.डी.पाटील यांच्याकडे शनिवारी दोन अज्ञात भामटे आले व आम्ही राजस्थानचे रहीवासी असून एका ठिकाणी खोदकाम करतांना आम्हास जवळपास एक किलो सोन्याचे दागिने सापडले असून आम्ही त्या दागिण्यांचे मणी केले आहेत. बाजार भावानुसार जवळपास ६० लाख रुपये किमतीचे दागीने आपणास केवळ सात लाख रुपयात देत आहोत, असे त्या दोघांनी सांगितले. या आमीषाला प्रा. पाटील बळी पडत त्यांनी ते मणी रोख सात लाख रुपयात खरेदि केल विजयादशमीचे दिवशी त्यांनी ते मणी मपासणीसाठी नेले असता ते नकली असल्याचे समजल्यावरून रविवारी येथील पोलीस ठाण्यात प्रा. पाटील यांनी दोन अज्ञात भामट्यांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरात चर्चा
भामट्यांकडून दिलेल्या आमीषाला शहरातील एक सुशिक्षीत कुटूंब बळी पडून त्यांचेकडून अल्पावधित सात लाख रुपयाची रोकड लंपास केल्याने शहरात या घटनेची चर्चा चांगलीच रंगलीआहे.