फ्लॅट खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्याची ४१ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:17 AM2021-07-26T04:17:03+5:302021-07-26T04:17:03+5:30

जळगाव : शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश रामचंद्र तिवारी (४९) यांना फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी (ता. धरणगाव) येथील दाम्पत्याने सुमारे ...

Fraud of Rs 41 lakh to farmers under the guise of buying flats | फ्लॅट खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्याची ४१ लाखांनी फसवणूक

फ्लॅट खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्याची ४१ लाखांनी फसवणूक

Next

जळगाव : शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश रामचंद्र तिवारी (४९) यांना फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी (ता. धरणगाव) येथील दाम्पत्याने सुमारे ४१ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील वासुकमल नंदनवन अपार्टमेंट येथे दिनेश रामचंद्र तिवारी राहतात. ते शेती करतात. दरम्यान, वासुकमल नंदनवन इमारतीतील पहिल्या मजल्यावर हरीश रामचंद्र झंवर व पूजा हरीश झंवर (पाळधी, ता. धरणगाव) यांच्या मालकीचा फ्लॅट विक्रीला असल्याची माहिती तिवारी यांना एजंट बिरज जैन यांच्यामार्फत मिळाली. फ्लॅट पाहिल्यानंतर त्यांना तो आवडला.

या फ्लॅटवर कुठलाही बोझा नसल्याचे झंवर याने सांगितल्यानंतर तिवारी यांनी टोकन म्हणून ११ हजार रुपये त्यांना दिले. दरम्यान, तिवारी यांनी मालमत्ता घेताना कोणाचाही आक्षेप होऊ नये म्हणून ३० सप्टेंबर २०१९ रोजी वर्तमानपत्रात नोटीस दिली. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी फ्लॅट खरेदीसंदर्भात झंवर याला सांगितले असता सौदापावती न करता तोंडी घराचा ताबा देऊन खरेदी नंतर करतो, असे सांगितले. तिवारी यांनी विश्वास ठेवून झंवर याच्या मागणीनुसार ७ ऑक्टोबर रोजी ७ लाख ४० हजार, ९ ऑक्टोबरला ५ लाख, १० ऑक्टोबरला ५ लाख, ११ ऑक्टोबरला ५ लाख तसेच १४ ऑक्टोबरला ४ लाख, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी चेकने ५ लाख व ४ लाख ४० हजार रुपये तसेच गुगल पे ने अनुक्रमे १८ हजार व २० हजार असे एकूण ४१ लाख १९ हजार रुपये दिले. दरम्यान, मे महिन्यात तिवारी यांचा अपघात झाला. त्यामुळे ते घरी होते. नंतर तिवारी यांनी फ्लॅट खरेदीचा तगादा लावल्यानंतर झंवर याने कागदपत्रे दिली. त्यात एका बँकेचा बोझा असल्याचे दिसून आले.

फ्लॅट खरेदीसाठी बोझा क्लिअर करून द्यावा, असे सांगितले असता झंवर याने ८ सप्टेंबर २०२० ला तिवारी यांना नोटीस पाठविली. त्यात ६७ लाख ५१ हजार रुपये एवढी रक्कम ठरलेली असून, आपण फक्त ५ लाख ३८ हजार रुपये दिल्याचे त्यात नमूद होते. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिवारी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हरीश झंवर व पूजा झंवर या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fraud of Rs 41 lakh to farmers under the guise of buying flats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.