कोवीड किटच्या एजन्सीसाठी व्यापार्याची ५५ हजारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 08:20 PM2020-11-07T20:20:44+5:302020-11-07T20:21:04+5:30
जळगाव : मास्क आणि कोवीड कीटची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून चेतन डिगंबर वाणी ( वय ४३, रा.गणेश कॉलनी) या ...
जळगाव : मास्क आणि कोवीड कीटची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून चेतन डिगंबर वाणी ( वय ४३, रा.गणेश कॉलनी) या कापड व्यापार्याची ५५ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला
आह.
चेतन डिगंबर वाणी यांना २४ जुलै रोजी दुपारी वाणी हर्षील पटेल या नावाने प्रितमपूर येथून बोलत असून आमची ए यू २४ एच ७ नावाची मास्क व सॅनिटायझर, कोवीड कीट तयार करण्याची कंपनी आहे. ऑनलाईन ऑर्डर घेवून साहित्य घरपोच पोहचवित असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर संबंधिताने वाणी यांना जळगावची एजन्सी घ्या, असे सांगून आम्ही सर्व मटेरीयल घरपोच पाठवू असे सांगितले. एजन्सी घेण्याचा फॉर्म सुध्दा संबंधिताने पाठवला. यानंतर वाणी यांनी दिलेल्या मेल आयडीवर सर्व डिटेल्सही संबधिताने पाठविले.
२५ जुलै रोजी रोजी वाणी यांनी संबंधितांना फोनवरुन एजन्सी घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यानंतर दुसर्या दिवशीच फोन आला. फोनवरुन खुशबू मॅडम बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एजन्सी घ्यावयाची असेल तर रजिस्ट्रेशन व ५५ हजार ५० रुपये डिपॉझिट करावे लागलीत, असे सांगण्यात आले. त्यानुसार २७ जुलै रोजी वाणी यांनी मध्यप्रदेश येथील बॅक ऑफ बडोदाच्या निपानीया शाखेत ए.यू.निखिल कुमावत नावाने
असलेल्या खात्यावर ५५ हजार ५०० रुपये जमा केले. पेैसे जमा केल्यावरही माल न आल्याने वाणी यांनी संबधितांना संपर्क साधला असता ४ ऑगस्ट पर्यंत मिळेल असे सांगून उडवाउडवीचे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर वाणी यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.