गॅस एजन्सीच्या डीलरशीपच्या नावाने साडेनऊ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:15+5:302021-02-06T04:27:15+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हरसिंग राठोड यांचा अशोक चक्रवर्ती आणि रवी कुमार नावाच्या व्यक्तीशी मोबाईलवर संपर्क झाला. ३० डिसेंबर ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हरसिंग राठोड यांचा अशोक चक्रवर्ती आणि रवी कुमार नावाच्या व्यक्तीशी मोबाईलवर संपर्क झाला. ३० डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान या अनोळखी व्यक्तीनी राठोड यांना भारत गॅस एजन्सीची डीलरशिप देतो असे सांगून भारत सरकारची राजमुद्रा असलेले व राजमुद्रावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा शिक्का मारून बनावट कागदपत्रे तयार केली. ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यावर पुन्हा भारत गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचा लोगो व नाव तयार करून बनावट मेल आयडीवरुन दिलीप राठोड यांच्या मेल आयडीवर पाठविले. पाठविलेल्या मेल आयडीमध्ये बँकेचे नाव व खाते क्रमांक पाठविला. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार बँक खात्यात ९ लाख ५० हजार रुपयांची रक्कम भरली. पैसे भरूनही भारत गॅस एजन्सीची डीलरशिप देण्यासाठी टाळाटाळ केली. आपली फसवणूक होत असल्याचे समजताच राठोड यांनी सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.