ट्रॅक्टर खरेदीत शेतकऱ्याची सव्वा लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 08:28 PM2020-11-24T20:28:21+5:302020-11-24T20:28:54+5:30

गुन्हा दाखल : ऑनलाईन साइर्डवर दाखविले ट्रॅक्टर

Fraud of Rs | ट्रॅक्टर खरेदीत शेतकऱ्याची सव्वा लाखात फसवणूक

ट्रॅक्टर खरेदीत शेतकऱ्याची सव्वा लाखात फसवणूक

googlenewsNext

जळगाव : ओएलएक्स या ऑनलाईन साईडवर ट्रॅक्टर विक्रीबाबत आलेल्या माहितीवर विश्वास ठेऊन व्यवहार करणे शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अशोक विश्वनाथ बारसे (५०, रा.शिवाजी नगर) या शेतकऱ्याची १ लाख ३० हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्वनाथ बारसे यांना शेतीच्या कामासाठी ट्रक्टरची आवश्यकता असल्याने मित्र धनराज भगवान करे (रा.जळके ता.जळगाव) यांच्या ओलक्स ॲपवर अशोकसिंग गुजर यांचे ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे समजले. दोघांनी ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपूर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार निम्मे रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोंडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नोव्हेंबरला नरेश कुमार याच्या कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खात्यावर दाणाबाजार शाखेच्या स्टेट बँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक बारसे यांनी मंगळवारी अशोकसिंग गुर्जर विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नादुरकर करीत आहे.

Web Title: Fraud of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.