व्यावसायिकांची २ लाख ८१ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:38+5:302021-03-07T04:15:38+5:30

जळगाव : ठिंबक नळीच्या व्यावसायिकाची २ लाख ८१ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ...

Fraud of traders in 2 lakh 81 thousand | व्यावसायिकांची २ लाख ८१ हजारात फसवणूक

व्यावसायिकांची २ लाख ८१ हजारात फसवणूक

Next

जळगाव : ठिंबक नळीच्या व्यावसायिकाची २ लाख ८१ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिराग संजय शहा (रा.गणपतीनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

गणपती नगरातील चिराग शहा यांचा शेतीसाठी लागणारे ठिंबक नळीचा व्यावसाय आहे. २२ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता चालक पंकज रघुनाथ सोनवणे याला २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे २०१ ठिंबक नळीचे बंडल देवून त्याला जालना येथील प्रवीण झंवर, गोपाल लोहीया आणि रोमीत भक्कड यांच्याकडे पोहचविण्यास सांगितले होते़ दरम्यान, तेव्हापासून आजपर्यंत चालक पंकज सोनवणे याने पैसे दिले नाही. वारंवार तगादा लावूनही कोणतेही पैसे न मिळाल्याने ५ मार्च रोजी सायंकाळी चिराग शहा यांच्या फिर्यादीवरून चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fraud of traders in 2 lakh 81 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.