लोन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास नोएडातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:45+5:302021-07-24T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पॉलिसी लोन देण्याच्या नाखावाली भडगावातील तरुणाची १ लाख ७५ हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी सायबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पॉलिसी लोन देण्याच्या नाखावाली भडगावातील तरुणाची १ लाख ७५ हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी नोएडातून एकाला बेड्या ठोकल्या आहे. गिरीश सिंग उर्फ सागर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भडगावातील यशवंत नगरात सैय्यद अलीम सैय्यद शौकत पटवे वास्तव्यास आहेत. १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नेहा शर्मा, रोहित वर्मा, अनिकेत श्रावण व संचित जाधव यांनी सैय्यद अलीम यांच्याशी वारंवार संपर्क साधून पॉलिसी लोन देण्याच्या नावाखाली पैसे उकळले होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सैय्यद अलीम यांनी सायबर पोलिसात गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याप्रकरणी सायबर पोलिसांनी पुष्पेंदर कुमार याला अटक केली होती. चौकशीत त्याने साथीदार गिरीश सिंग उर्फ सागर याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी दिल्ली गाठले. संशयित हा नोएडा येथे असल्याचे कळताच, गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी सायबर पोलिसांचे पथक जळगावात आल्यानंतर संशयित गिरीश याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, अरविंद वानखेडे, पंकज वराडे, गौरव पाटील आदींनी केली आहे.