पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जयहिंद शाळेतर्फे मोफत निवास व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:55 PM2020-08-30T16:55:56+5:302020-08-30T16:56:57+5:30

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांच्या रात्रीच्या निवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून नगरसेवक प्रताप शिंपी व जयहिंद व्यायामशाळेने माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला आहे

Free accommodation by Jayhind School for relatives of positive patients | पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जयहिंद शाळेतर्फे मोफत निवास व्यवस्था

पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जयहिंद शाळेतर्फे मोफत निवास व्यवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे अमळनेर : कठीण परिस्थितीत माणुसकीच्या नात्याचे दर्शनपॉझिटिव्ह रुग्णासोबत आले म्हणून नातेवाईकही देत नाही थारा

संजय पाटील
अमळनेर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांच्या रात्रीच्या निवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून नगरसेवक प्रताप शिंपी व जयहिंद व्यायामशाळेने माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला आहे
पॉझिटिव्ह रुग्णाने ग्रामीण रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना सुरक्षेसाठी ग्रामीण रुग्णालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णासोबत आलेले नातेवाईक बाहेरच थांबून कुठेतरी आसरा घेत होते. त्यांचे हाल होत होते. ग्रामीण भागातून आलेले लोक गरीब असल्याने त्यांना खाजगी लॉज किंवा घर भाड्याने घेणे परवडण्यासारखे नाही. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत असल्याने जवळचे नातेवाईकदेखील आपल्याकडे थांबू देत नाहीत. म्हणून त्यांना बहिष्कृत झाल्यासारखे वाटत होते. अशातच गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर उघड्यावरसुद्धा झोपता येत नव्हते. म्हणून जयहिंद व्यायामशाळेचे अध्यक्ष नगरसेवक प्रताप शिंपी व सचिव जीवन पवार यांनी व्यायामशाळेच्या वर बांधलेल्या सभागृहात ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यासाठी पाणी, पंखे, सॅनिटायझर सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रात्रभर थांबून रुग्णांचे नातेवाईक पुन्हा आपल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी सकाळी ग्रामीण रुग्णालयाकडे निघून जातात. जयहिंद व्ययमशाळेच्या सेवेने रुग्णांच्या नातेवाईकांना धीर मिळत असून माणुसकीच्या नात्याचा अनुभव येत आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री थांबण्याची सुविधा मिळत नसेल तर त्यांनी संपर्क साधावा. त्यांना राहण्याची मोफत व्यवस्था केली जाईल.
-प्रताप शिंपी, अध्यक्ष, जयहिंद व्यायामशाळा, शिरूडनाका, अमळनेर

Web Title: Free accommodation by Jayhind School for relatives of positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.