इंग्रजी निवासी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:03 PM2018-05-22T17:03:28+5:302018-05-22T17:03:28+5:30
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे़ त्यासोबतच विविध निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहेत़
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२२ - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे़ त्यासोबतच विविध निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहेत़ त्याच गुणांकनानुसार शाळांची निवड करून विद्यार्थ्यांचा मोबदला निवासी इंग्रजी शाळांना दिला जाणार असल्याचे परिपत्रक आदिवासी विकास विभागातर्फे काढण्यात आले आहे़
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील काही वर्षातील घटना निदर्शनास आल्यामुळे नामांकित निवासी शाळांची निवड व गुणांकामध्ये सुधारणा करण्याची निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे़ त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेची निवड करताना प्रचलित निकषामुळे गुणवत्तापूर्ण शाळांची निवड करण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असून पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील़ तर सुविधा नसणाऱ्या शाळांना अपात्र ठरविण्यात येणार आहे़
शाळांना मिळणार गुण
निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहे़ त्यानूसार ८० गुण मिळविणाºया शाळांना प्रति विद्यार्थी ७० हजार, ७० ते ७९ दरम्यान गुण मिळविणाºया शाळांना ६० हजार व ६० ते ६९ गुण मिळविणाºया शाळांना ५० हजार रूपये इतकी रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे़ ६० पेक्षा कमी गुणांकन झालेल्या शाळांचे प्रस्ताव अपात्र ठरविले जणार आहे़