जामनेरला ५४ हजार ग्राहकांना मोफत सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:28 PM2020-04-08T15:28:28+5:302020-04-08T15:29:19+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
जामनेर, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या निर्णयाचा लाभ तालुक्यातील सुमारे ५४ हजार ग्राहकांना मिळणार आहे. गारखेडा, नेरी, पहूर, शेंदुर्णीं, तोंडापूर, जामनेर, फत्तेपूर, लोहारा , बेटावद, वाकोद, जामनेरपुरा या भागात विविध कंपण्याचे गॅस वितरण करण्याचे ठिकाण आहे. तालुक्यात योजनेचे एकूण ५४ हजार लाभार्थी असून त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना एप्रिल ते जून २०२० यादरम्यान तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे. तसेच एप्रिल महिन्यात सिलिंंडर खर्चाची रक्कम उज्ज्वला गॅस लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर ग्राहकाला सिलेंडर खरेदी करता येईल. ग्राहकाला दर महिन्याला एक सिलिंडर मिळणार आहे. शेवटचे सिलेंडर मिळाल्यानंतर १५ दिवसानंतर लाभार्थी ग्राहकाला पुढील सिलिंडर बुक करता येईल.
चार हजार लाभार्थींच्या खात्यावर रक्कम?
तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जवळपास ५४ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी चार हजार लाभार्थींच्या खात्यावर एप्रिल महिन्याची सिलिंंडर खर्चाची रक्कम जमा झालेली आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासनाने लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहे.
लाभार्र्थींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. लाभार्थींनी ते पैसे काढून मोबाईलद्वारे गॅस बुकिंग करावी. घरपोच त्यांना सिलेंडर मिळणार असून, वितरित करणाऱ्यांकडे त्यांनी सिलिंडरचे पैसे देऊन सिलिंंडर घ्यावा.
-अभिषेक पाटील, समर्थ गॅस एजन्सी, जामनेर