जळगाव जिल्ह्यात २५ हजार बीपीएलधारकांना मोफत वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:50 PM2018-06-12T12:50:59+5:302018-06-12T12:50:59+5:30

सौभाग्य योजना

Free electricity to 25 thousand BPL holders in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात २५ हजार बीपीएलधारकांना मोफत वीज

जळगाव जिल्ह्यात २५ हजार बीपीएलधारकांना मोफत वीज

Next
ठळक मुद्दे३९ हजार एपीएलधारकांनाही मिळणार लाभशहरात ७२५ जणांना मिळणार लाभ

सागर दुबे
जळगाव : सौभाग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार ५५८ दारिद्रय रेषेखालील (बीपीएलधारक) लाभार्थी कुटुंबियांना महावितरणतर्फे मोफत वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़ एवढेच नव्हे तर दारिद्र्य रेषेवरील (एपीएलधारक) ३९ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबियांकडून १० महिने दरमहा ५० रुपये आकारण्यात येऊन वीजजोडणी देण्यात येणार आहे़
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना 'सौभाग्य' या योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील ६४ हजार १३४ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्यात येणार आहे. यातील २४ हजार ९४१ बीपीएल लाभार्थ्यांना विना शुल्क तर एपीएल धारकांना फक्त ५०० रुपयात वीज जोडणी देण्यात येईल़ एपीएलधारकांना दर महा ५० रुपये प्रमाणे १० महिन्यासाठी ५०० रुपये बिलांतून घेण्यात येणार आहे. यात महावितरण कंपनीकडून त्याठिकाणी लागणारी विद्युत यंत्रणा व साहित्य मोफत पुरविले जाणार आहे.
दीड लाख वीज जोडणीचे उद्दीष्ट
सौभाग्य योजनेंतर्गत जळगांव परिमंडळात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून १ लाख ७० हजार १७५ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी १ लाख ४८ हजार ९३४ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार २४१ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़
वीज साहित्य मोफत पुरविले जाणार
लाभार्थ्यांना वीजेसह वीज जोडणी देखील मोफत देण्यात येणार आहे़ त्यासाठी लागणारे विद्युत साहित्य अर्थात वीज मीटर, वायर तसेच पोल सुध्दा महावितरणतर्फे पुरविण्यात येणार आहे़ त्यामुळे एकही रूपया लाभार्थ्यांना भरण्याची गरज भासणार नाही़
शहरात ७२५ जणांना मिळणार लाभ
सौभाग्य योजनेतंर्गत योजनेतंर्गत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना वीज जोडणी करून मिळणार आहे़ यासाठी लाभार्थ्यांना एक रूपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही़ दरम्यान,मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आली आहे़ महावितरण कंपनीकडून सौभाग्य योजनेतंर्गत शहरातील ६१७ बीपीएलधारकांना मोफत तर १०८ एपीएल धारकांना ५०० रुपयात वीजजोडणी दिली जाणार आहे. ही योजना आजपर्यत वीज जोडणी न घेतलेल्या बीपीएल व एपीएलधारकांसाठी राबविण्यात येत आहे़

Web Title: Free electricity to 25 thousand BPL holders in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.