यावल येथे मोफत नेत्रशिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:33 PM2018-12-15T22:33:55+5:302018-12-15T22:35:31+5:30

यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.

Free eye surgery at Yaval | यावल येथे मोफत नेत्रशिबिर

यावल येथे मोफत नेत्रशिबिर

Next
ठळक मुद्दे२०४ रुग्णांची शिबिरात तपासणी२० रुण्ग शस्त्रक्रियेसाठी पात्र

यावल, जि.जळगाव : यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.
अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे डॉ.पराग पाटील होते. शिबिराचे उद्घाटन मातोश्री फाऊंडेशन पिंपरूडचे चंद्रकांत जंगले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, डॉ.प्रशांत जावळे, कांताई नेत्रालयाचे डॉ. जाधव व संजय सराफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.फेगडे यांनी सांगितले की, तेरावे मोफत शिबिर असून, शिबिराची वर्षपूर्ती तालुक्यातील ज्येष्ठांच्या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाली व यापुढेदेखील आश्रय फाऊंडेशन मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येणार आहे.
शिबिरात २०४ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील २० रूग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. सायंकाळी त्यांच्यावर कांताई नेत्रालय जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वितेकरीता स्नेहल फिरके, भूषण फेगडे, संजय फेगडे, हेमंत फेगडे, रितेश बारी, मनोज बारी, जयराम फेगडे, लीलाधर काटे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Free eye surgery at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.