‘दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे, कृत्रिम पावसासाठी प्रयत्न व्हावेत!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:00+5:302021-07-05T04:13:00+5:30

मुक्ताईनगर : जळगाव व बुलडाणा जिल्ह्यांत हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. जून ...

‘Free fertilizers and seeds should be made available to farmers for double sowing, efforts should be made for artificial rain!’ | ‘दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे, कृत्रिम पावसासाठी प्रयत्न व्हावेत!’

‘दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे, कृत्रिम पावसासाठी प्रयत्न व्हावेत!’

Next

मुक्ताईनगर : जळगाव व बुलडाणा जिल्ह्यांत हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून टाकली आहे. जुलै महिना उजाडला तरीसुद्धा अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. त्यामुळे पावसाअभावी नाइलाजास्तव शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. तरी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध होणे तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करावे, असे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे केले आहे.

वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविल्याप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगाव व बुलडाणा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. परंतु पाहिजे तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेलेली आहे.

पावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे. तसेच सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. तो बऱ्याच ठिकाणी यशस्वीसुद्धा झाला होता. त्याचप्रमाणे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावे, असे खासदार खडसे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

Web Title: ‘Free fertilizers and seeds should be made available to farmers for double sowing, efforts should be made for artificial rain!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.