चाळीसगावात रुग्णांसाठी मोफत अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:29 PM2019-11-25T18:29:23+5:302019-11-25T18:30:56+5:30

चाळीसगाव , जि.जळगाव : हिरकणी महिला मंडळ व लोकनायक महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे सतीश चंद्रसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील ...

Free food pantry for forty patients | चाळीसगावात रुग्णांसाठी मोफत अन्नछत्र

चाळीसगावात रुग्णांसाठी मोफत अन्नछत्र

googlenewsNext
ठळक मुद्देहिरकणी महिला मंडळ व महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठानचा उपक्रमअन्नछत्रासाठी मदत करण्याचे आवाहन

चाळीसगाव, जि.जळगाव : हिरकणी महिला मंडळ व लोकनायक महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे सतीश चंद्रसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील बापजी रुग्णालयात रुग्ण आणि रुग्णांच्या एका नातेवाईकांसाठी आजपासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले.
याप्रसंगी बापजी रुग्णालयात एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून स्मिता बच्छाव, डॉ.संदीप देशमुख, कोकिळा राजपूत, नगसेवक दीपक पाटील, उत्तमराव पाटील, सुबोध वाघ, बन्सी मेहता, अनिता शर्मा, मीना चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी धन्वंतरी मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. श्रीकांत राजपूत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले तर नगरसेविका सविता राजपूत, डॉ.संदीप देशमुख आणि स्मिता बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव म्हणाल्या की, हिरकणी महिला मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष सुचित्रा पाटील, प्रीती रघुवंशी, वैशाली काकडे, सुनंदा राजपूत, राहुल राजपूत, कविता अमृतकार, सुरेखा राजपूत, आस्वाद महाशब्दे, प्रताप भोसले, टोनू राजपूत, दीपक अमृतकार, बाबा दीक्षित, विठ्ठल राजपूत, मिलिंद राजपूत, पप्पू राजपूत, दीपक पाटील, अमित गुप्ता, गीतेश कोटस्थाने, संजय चौधरी, अनिल वराडे, दिलीप जाणे, पंकज सुराणा, मुराद पटेल यांचे सहकार्य लाभले तर अन्नछत्राला नागरिकांनी मदत करावी, असे आवाहनदेखील मंडळाच्या वतीने करण्यात आले आणि ज्यांना मदत करायची असेल त्यांनी हिरकणी महिला मंडळाला संपर्क साधावा, असे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Free food pantry for forty patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.