एरंडोल येथे रुग्णांना मोफत भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 05:44 PM2017-09-25T17:44:05+5:302017-09-25T17:45:39+5:30
निस्वार्थ सेवा : अ.भा.मानव अधिकार संस्थेचा सेवाभावी उपक्रम
आॅनलाईन लोकमत
एरंडोल, दि.२५ : अखिल भारतीय मानव अधिकार संस्थेतर्फे एरंडोल ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवित माणुसकी व मानवता धर्म जोपासला जात आहे.
मशीदअली परिसरातील रहिवासी व अखिल भारतीय मानव अधिकार संस्थेच्या माध्यमातून एरंडोल ग्रामीण रुग्णालयासह खाजगी ५ ते ६ खाजगी रुग्णालयामधील रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या दोन नातेवाईकांना दुपारचे व रात्रीचे असे दोन वेळेचे भोजणाचे डबे मोफत दिले जात आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून माणुसकी व मानवता धर्म जोपासला जात आहे. त्यामुळे ‘तेथे कर माझे जुळती’ अशी भावना आजारी माणसे व्यक्त करीत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ शेख, नासीर पठान, जहांगीर शेख, अरीफ शेख इ.कार्यकर्ते आपल्या इतर सहकाºयांसह आपले दैनंदिन कामकाज सांभाळून ही जबाबदारी पार पाडत आहे. मुस्लीम समाज बांधवांकडून जातीय सलोखा व मानवता धर्म वृद्धिंगत करण्याचे काम सुरु आहे.